अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: घरात एकट्या असलेल्या युवतीवर अत्याचार; घटनेचे व्हिडिओ…

अहमदनगर- घरात एकट्या असलेल्या युवतीवर तिघांनी जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. तसेच त्या घटनेचा व्हिडीओ तयार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, त्यातील पळून जाण्याच्या तयारीत असलेला एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन जण पसार झाले आहेत. अन्य दोघांना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

पीडित 18 वर्षीय युवतीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, फेब्रुवारी 2022 दरम्यान एका दिवशी दुपारी दोन वाजे दरम्यान पीडित युवती ही तिच्या घरात एकटीच होती. या संधीचा फायदा घेऊन तिघांनी संगनमत करून तिच्या घरात घुसले. रवींद्र सरोदे याने तिचा हात धरून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तर राहुल सरोदे याने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने शारिरीक अत्याचार केला. तर अनिल लोंढे याने मोबाईलवर व्हिडीओ तयार केला. तसेच तो व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन पुन्हा शरीरसुखाची मागणी केली.

 

बुधवारी रात्री पीडित तरुणीने राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी माहिती घेतली.

 

पीडित युवतीच्या फिर्यादीवरून रवींद्र दगडू सरोदे, राहुल अनिल सरोदे, अनिल लोंढे (तिघे रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) या तिघांवर जबरदस्तीने घरात घुसून शारिरीक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, पोलीस नाईक गणेश लिपने, प्रमोद ढाकणे आदी पोलीस पथकाने या घटनेतील राहुल अनिल सरोदे याला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला देवळाली प्रवरा शहर हद्दीत पकडून ताब्यात घेतले. तर रवींद्र सरोदे व अनिल लोंढे हे दोन आरोपी पसार झाले आहेत. राहुल सरोदे याला काल न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button