अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

अहमदनगर- अहमदनगर- पुणे महामार्गावर पळवे खुर्द (ता. पारनेर) शिवारात आज्ञात वाहनाच्या धडकेत 70 वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना घडली.
सदर व्यक्ती 70 वर्षीय असून त्यांचा एक डावा डोळा निरुपयोगी आहे. अंगात पाढरा नेहरु, पायजमा असून आतमध्ये भगव्या रंगाची कोपरी आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणास माहिती असल्यास सुपा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- याबाबत आमोल अशोक शेळके (रा. पळवे) यांनी सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री 10.30 वाजता पुणे नगर महामार्गावर पळवे खुर्द शिवारात हाँटेल सह्याद्री जवळ एका अज्ञात वहानाने धडक दिल्याने रस्त्याने पायी जात आसलेला 70 वर्षीय वृद्ध जखमी झाला.