अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ह्या ठिकाणी आढळला तरुणाचा मृतदेह !

अक्षय्य तृतीयेपासून बेपत्ता असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर येथील तरुणाचा मृतदेह काल निपाणी वडगाव येथे पाटाच्या कडेला मांजरे वस्ती लगत रेल्वे लाईनपासुन काही अंतरावर आढळून आला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मातापुर येथील सतीश बबन गायकवाड (वय 27) हा तरुण दि. 3 मे 2022 रोजी अक्षय तृतीया यादिवस पासून घरात कोणालाही माहिती न देता निघून गेला होता.
त्यानंतर सदर तरूणाने नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती या ठिकाणी नातेवाईकाच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रमप्रसंगी भेट दिली. त्यानतंर तेथुन पुढे सदर तरुणाबद्दल कुणालाही माहीती नव्हती.
मांजरे वस्ती येथील तरुण प्रातःविधीसाठी जात असताना त्यास मयत व्यक्ती व शेजारी असलेली बॅग, चप्पल आढळून आली. यावेळी मांजरे या तरुणाने प्रसंगावधान राखत सदर मयत इसम याबाबत शेतमालक सुधीर रोकडे यांना दिली.
त्यानंतर त्यांनी संबंधित माहिती ग्रामपंचायत सदस्य त्यांचे मामा सर्जेराव देवकर यांना कळविली. श्री. देवकर यांनी यासंदर्भात पोलिस प्रशासनाशी संपर्क साधुन मयत इसमाविषयी माहिती दिली.