अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: तरूणीवर अत्याचार, युवतीचा विनयभंग; परस्परविरोधी फिर्यादी, चौघांना अटक

नगर तालुक्यातील एका गावामध्ये एका गटाच्या तरूणीवर अत्याचार करण्यात आला तर दुसर्‍या गटाच्या युवतीचा विनयभंग करण्यात आला.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. दरम्यान दोन्ही गटाच्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत. 15 मार्च, 2022 रोजी आरोपीने अत्याचार केला.

सोमवार, 9 मे, 2022 रोजी दुपारी आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केले. तसेच तलवारीने मारहाण करून जखमी केले. दोन्ही आरोपींनी तरूणीसह तिच्या सासूला दगडे फेकून मारली, घरावर दगडफेक केली असल्याची फिर्याद पीडित तरूणीने दिली आहे.

युवती घरामध्ये असताना आरोपी तेथे आला व म्हणाला,‘तुझा पती व दीर माझ्या पत्नी व वहिणीला फोन का करतो’, तेव्हा युवती त्याला म्हणाली,‘तुझ्याकडे काही रेकॉडिंग आहे का?’, असे म्हणताच आरोपीने युवतीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

आरोपी युवतीला म्हणाल,‘तुझ्या पतीला व दीराला गोळ्या घालून ठार मारील, तुमचा वंश बुडून टाकीन’, अशी धमकी दिली. आरोपींनी युवतीच्या पती व दीराला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घराच्या बाहेर जाताना दगडफेक केली असल्याचे पीडित युवतीने फिर्यादीत म्हटले Pआहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button