अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: व्यापाऱ्यावर हल्ला करीत रक्कम लुटली

अहमदनगर- दुचाकीवरून जात असलेल्या येवला येथील होलसेल कपडे व्यापाऱ्यास मारहाण करत दोन अज्ञात चोरट्यांनी सव्वालाखाची रोकड लुटून पोबारा केला. ही धक्कादायक घटना सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात घडली आहे. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

 

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अज्ञात दोन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील होलसेल कपडा व्यापारी समशेर अहमद मोहम्मद रमजान अन्सारी (42 वर्ष) हे 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास उधारीचे पैसे गोळा करून त्यांच्या घरी येवला येथे जात असताना नगर मनमाड महामार्गावर येसगाव शिवारात मोटरसायकल आलेल्या दोन जणांनी त्यांच्या मोटरसायकल लाथ मारली.

 

त्यानंतर अन्सारी काटेरी झुडपात पडले व दोघांनी अन्सारी यांना जबर मारहाण करुन त्यांच्याकडे असलेली सव्वा लाखाची रोकड लांबविले आहे. याप्रकरणी कापड व्यापारी अन्सारी यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक जाधव यांनी भेट दिली आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे पुढील तपास करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button