अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ बहुचर्चित हत्याकांडातील आरोपींचे जामीन फेटाळले

अहमदनगर- बहुचर्चित संदीप वराळ (रा. निघोज ता. पारनेर) हत्याकांडातील आरोपी प्रविण रसाळ आणि ऋषिकेश उर्फ भैय्या भोसले या दोघांचा मोक्का गुन्ह्यातील जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मिलींद कुर्तडीकर यांनी हा निर्णय दिला.

 

निघोज गावचे माजी सरपंच संदीप वराळ यांची 21 जानेवारी 2017 हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर आरोपी प्रविण रसाळ, माऊली रसाळ, विकास रसाळ, पिंट्या रसाळ, ऋषिकेश उर्फ भैय्या भोसले, नागेश लोखंडे, राहुल साबळे, अक्षय लुढे, प्रशांत बर्डे, प्रशांत वराळ, राजू भंडारी आणि मुक्तार इनामदार यांच्याविरूद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.

 

प्रविण रसाळ आणि ऋषिकेश उर्फ भैय्या भोसले या दोघांनी जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर युक्तिवाद होऊन प्रविण रसाळ हा हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार असल्याने आणि आरोपी भैय्या भोसले याचा हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असल्याने न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button