अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: बस चालकास मारहाण करत…

अहमदनगर येथून शेवगावाला जाण्यासाठी निघालेल्या एस. टी. बसला दुचाकी आडवी लावून बस चालकास शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आज बुधवार दुपारी भिंगार शहरातील समाधान हॉटेलजवळ ही घटना घडली.

गणेश गोरक्षनाथ शेळके (वय 41 रा. खांडगाव लोसर ता. पाथर्डी) असे मारहाण झालेल्या एस. टी. बस चालकाचे नाव आहे. त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी (एमएच 16 सीएन 4771) वरील अज्ञात चालकाविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शेळके हे बुधवारी त्यांच्याकडील अहमदनगर- शेवगाव या बसमध्ये वाहक व 27 प्रवाशी घेवुन माळीवाडा बस स्थानक येथून शेवगावला जाण्यासाठी निघाले होते. ते अहमदनगर-पाथर्डी रोडने भिंगार शहरातून जात असताना समाधान हॉटेलसमोर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने बसला दुचाकी आडवी लावली.

त्याने शेळके यांना शिवीगाळ करत बसमध्ये प्रवेश केला. शेळके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button