अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दिराकडून सुटलेल्या गोळीत भावजयीचा मृत्यू, दिर गजाआड

अहमदनगर – कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे आज (गुरूवार) सकाळी साडेदहा वाजता दिराने भावजयीला गावठी कट्टा दाखवायच्या नादात गोळी सुटून भावजयी जखमी झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.

दिर विशाल भालेरावकडून गोळी सुटली आणि ती थेट भावजयी सुनिता संजय भालेराव (वय 32) यांच्या डोक्यात शिरली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनिता भालेराव यांना उपचारासाठी लोणी येथे हलवण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे.

विशाल भालेराव व त्याचे दोन साथीदार घटनेनंतर पसार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे. दरम्यान गोळीबार करणारा विशाल भालेराव याला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button