
अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बसणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा,
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.
नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- अहमदनगर ब्रेकिंग न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
- अहमदनगरच्या आणखी बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
- तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि ट्विटर वर फॉलो करा