अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची सोशल मीडियावर बदनामी

अहमदनगर- नगर जवळील निंबोडी येथील संदीप खामकर या तरूणाने फेसबुकवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे समोर आले आहे. त्या तरूणाविरूध्द भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर प्रभाकर काळे (वय 51 रा. तेलीखुंट) यांनी फिर्याद दिली आहे.

 

काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी 12 सप्टेंबर रोजी घरी असताना रात्री साडेनऊ वाजता माझ्या मोबाईलवर फेसबुक पाहत होतो. आ. बावनकुळे याचे फेसबुक पेजला मी जॉर्डन असुन मी फेसबुक पाहत असताना संदीप खामकर याने आ. बावनकुळे याचे फेसबुकला अर्वाच्य भाषा वापरून दोन गटात तेढ निर्माण होईल, असे कृत्य केले आहे.

 

आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांची जनमानसात प्रतिमा मलिन होईल असा मजकुर खामकर याने लिहीला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button