अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: विवाहितेचा राहत्या घरात मृतदेह; भावाने केला गंभीर आरोप

बुरूडगाव रोडवरील विनयनगरच्या समता कॉलनीतील राहत्या घरामध्ये विवाहिता मृतावस्थेत आढळून आल्याने अहमदनगर शहरात खळबळ उडाली आहे. सरोज रवी उपाध्याय असे मृत विवाहितेचे नाव आहे.

तिचा पती, सासू-सासरे व नणंद यांनी माझ्या बहिणीला मारहाण करून तिचा जीव घेतला असल्याचा आरोप मयत सरोजचा भाऊ अशोक कुमार यांनी केला आहे.

राजस्थानचे माहेर असलेल्या सरोजचा विवाह समता कॉलनीत राहणार्‍या रवी उपाध्याय याच्यासोबत झाला होता. त्यांना दोन मुले आहेत.

रविवार, 27 मार्च, 2022 रोजी रात्री 11 वाजेच्यासुमारास सरोजचा मृत्यू झाला असल्याचे तिचा भाऊ अशोककुमार यांनी सांगितले.

अशोककुमार हे कुटूंबासह दिल्ली येथे राहतात. घटनेची माहिती मिळताच त्यांनी अहमदनगर येथे धाव घेतली.

दरम्यान घटना घडल्यानंतर सरोजचा पती रवी, सासू-सासरे, नणंद हे सरोजच्या मुलांना घेऊन पसार झाले आहे.

मंगळवारी सकाळी 11 वाजता अशोककुमार व त्यांच्या कुटूंबाने सरोजचा मृतदेह समता कॉलनीमध्ये आणला होता. तेथे मोठी गर्दी जमली होती.

माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांनी सरोजचा छळ केला असून तिचा गळा दाबून जीव घेतला असल्याचा आरोप अशोककुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button