अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : मालवाहू टेम्पोमध्ये आढळला एकाचा मृतदेह !

श्रीरामपूर शहरात एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये आज एक मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात भागातील दळवी वस्ती परिसरात राहणारे सचिन विश्वास सराफ ,वय 48 वर्ष हे एका मालवाहतूक टेम्पोच्या केबिनमध्ये मृत अवस्थेत मिळून आले.

त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना साखर कामगार रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सचिन सराफ हे उपचारापूर्वी मयत असल्याचे शहर पोलिसांना कळवले.

त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन सराफ यांचा मृत्यू कशामुळे झाला? मृतदेह टेम्पो कसा आला ? याचा पुढील तपास तपासी अंमलदार पोलीस नाईक आडांगळे यांच्याकडून चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button