अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कंपनीत आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

अहमदनगर- नागापूर एमआयडीसीतील इटाँन कंपनीत बेशुध्द अवस्थेत 30 वर्षीय तरुण आढळून आल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सोमवारी दुपारी इटाँन कंपनीत 30 वर्षीय तरुण बेशुध्द अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. त्याची ओळख पटली नसून अधिक तपास पोलीस नाईक बाळासाहेब दाताळ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button