अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: बंधाऱ्यात तरूणाचा मृतदेह आढळला; आत्महत्या की घातपात?

Advertisement

अहमदनगर- पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जांभूळ नाळा नदीपात्रात १० दिवसांपूर्वी अनोळखी इसमाचा मृत्यूदेह आढळला होता. त्या मृतदेहाची ओळख पटवून शिर्डी पोलिसांनी घातपाताचा कट उघड करत आरोपींना जेरबंद देखील केले. आता पुन्हा बुधवारी सकाळी बाजारतळ परिसरात त्याच जांभूळ नाळ्यात 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना काही नागरिकांना दिसून आला.

 

ही माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला समजतात शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस नाईक मकासरे अदी घटनास्थळी दाखल झाले. दहा दिवसातील याच नाल्यातील ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

Advertisement

 

सदर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी स्थानिक नागरिकांना आवाहन केले असता हा मृतदेह गावातीलच असल्याचे सांगण्यात आले. राजेंद्र चांगदेव औताडे व मृत व्यक्तीच्या आईने हा मृतदेह संदीप सोपान गडाख यांचाच असल्याचे खात्रीशीर सांगितले. साधारण दोन ते तीन दिवसापासून मृत व्यक्ती घरी आली नसल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

 

Advertisement

बुधवारी सकाळीच या व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचा आढळून आल्याने हा घातपात, अपघात की आत्महत्या याचा उलगडा करणे शिर्डी पोलीस स्टेशन समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करीत आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button