अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: नदीपात्रात तरूणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

अहमदनगर – जांभूळ नाला (ता. कोपरगाव) नदी पात्रात एका अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज (रविवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

 

३५ ते ४० वर्षे वयोगटातील तरूण असून सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह नदी पात्रात तरंगत असताना काही नागरिकांना आढळून आला त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला माहिती कळवली.

 

सदर इसमाच्या डोक्याला गंभीर जखम व नदीपात्रात गोणीत आढळलेला हा मृतदेह असल्याने हा घातपाताचाच प्रकार असू शकतो असा संशय बळावला आहे. घटनास्थळी पोहेगावचे सरपंच अमोल औताडे हे दाखल झाले असून पुढील कारवाई शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button