अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: व्यवसायिकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर- लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन (वय १४) मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना शिर्डी शहरात घडली. याप्रकरणी संशयीत आरोपी शहाबाज रियाज सय्यद विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

 

शिर्डी शहरात टेलरिंगचा व्यवसाय करत असलेल्या शहाबाज रियाज सय्यद (वय 24) याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला. पीडित मुलीने या त्रासाला कंटाळून अखेर 25 जुलै रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी शहाबाज सय्यद विरुद्ध तक्रार दिली आहे.

 

पिडीत मुलीच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीस तातडीने अटक केली आहे.

 

या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी शहाबाज सय्यद याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं 352/22 भादंवि कलम 376, 376 (3), बालकाचे लैगिक अत्याचार संरक्षण कायदा 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button