अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कर्जाला कंटाळले; माय-लेकाने कॉफीतून विषारी औषध घेतले

एका बँकेच्या कर्जाला कंटाळून माय-लेकाने कॉफीतून विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केली. रंजना सुरेंद्र गांधी (वय 65) व तिचा मुलगा हिमांशु सुरेंद्र गांधी (वय 35 दोघे रा. तपोवन रोड, अहमदनगर) असे मृत झालेल्या माय-लेकाचे नाव आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सावेडी उपनगरातील तपोवन रोडवर आज रविवारी ही घटना घडली. आज पहाटे रंजना व हिमांशु यांनी कॉफीमधून विषारी औषधाचे सेवन केले.

त्रास होऊ लागल्याने हिमांशु याने 108 नंबरवर फोन करून रूग्णवाहिका बोलून घेतली. रूग्णवाहिकेतून दोघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान औषध उपचारापूर्वीच रंजनाचा मृत्यू झाला. तर हिमांशुवर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button