अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ह्या ठिकाणी हरणाची शिकार !

श्रीरामपूर शहरातील सूर्यानगर भागात काल पहाटे पाच वाजेच्या सुमारास एक हरीण मृतावस्थेत आढळले. या हरणाची बिबट्याने शिकार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

घटनेनंतर पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. शहराला लागून शेती महामंडळाची टिळकनगर मळ्याची मोठ्या प्रमाणावर जमीन आहेत.

या ठिकाणी अलीकडच्या काळात हरणांचा वावर सुरू होता. त्यातच आज येथील लोकवस्तीत पहाटे मृतावस्थेत हरीण आढळले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बाळासाहेब भांड यांनी पालिका प्रशासन व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

या हरणाची शिकार ही बिबट्याने केली असल्याचा अंदाज काही जाणकारांनी व्यक्त केला आहे. तरी याबाबत वन विभागाला पुढील कारवाई करण्यासाठी संपर्क साधण्यात येत आहे.

श्रीरामपूर शहरात भर वस्तीत हरीण असे मृतावस्थेत सापडण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. ही हरणाची मादी गरोदर असण्याची शक्यता तिचा फोटो पाहील्यावर दिसून येते आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button