अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ तालुक्यात भूकंप सदृश्य धक्के बसल्याने खळबळ

अहमदनगर- गुरूवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात अचानक जमीन हादरल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे घरांच्या खिडक्या दरवाजे व छताची पत्रे धरधरले. भूकंपाच्या भितीने अनेकांनी घराबाहेर पळ काढला.

 

गुरुवार दि. 10 रोजी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा, गणेगाव, चिंचविहिरे परिसरात दोन ते तीन वेळा दहा ते 12 सेंकद भूकंप झाल्याप्रमाणे जमीन अचानक हादरली. त्यामुळे घराच्या खिडक्या, दरवाजे व पत्रे थरथरू लागल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. तसेच काही चारचाकी गाड्यांचे सायरनही अपोआप वाजयला सुरूवात झाली.

 

थोड्याच वेळात परिसरात एकमेकांना फोन करून खात्री केली असता अनेकांनी एकमेकास घडलेल्या घटनेला दुजोरा दिला. याबाबत राहुरीचे तहसिलदार फसियोद्दिन शेख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता या भागातून अनेकांचे फोन आले. मात्र हा भूकंप की अन्य कारणाने जमीन हादरली. याबाबतची माहिती तातडीने संबधित शासकीय यंत्रणेकडून मागवली आहे. या भागात भूकंपमापक यंत्र नसल्याने याबाबतची माहिती लगेच मिळू शकली नसली तरी मेरी (नाशिक) यांचेकडून त्यांचे भूकंपमापन यंत्रावर नोंद झाली असल्यास त्याबाबतची माहिती उद्या शासकीय यंत्रणेकडून उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात भुकंप झाल्याचे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button