अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: लाच घेताना इलेक्ट्रिक कंपनीच्या व्यवस्थापक व लिपिकास रंगेहाथ पकडले

अहमदनगर – पगाराची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या बाह्यस्त्रोत कर्मचार्‍याकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना संगमनेर येथील प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीच्या व्यवस्थापक व लिपिकास अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

 

प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीचे व्यवस्थापक सुनील पोपट पर्बत व लिपिक सुजाता तेजेश कांबळेे अशी पकडल्यांची नावे आहेत.

 

घुलेवाडी येथे राहणारे वीज वितरण कंपनीचा बाह्यश्रोत कर्मचारी हा संगमनेर येथील प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीकडे नेमणुकीस आहे. त्यांना सदर कंपनी कडून उप अभियंता, म.रा.वि.वितरण कंपनी कडून बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून सप्टेंबर 2018 पासून नेमण्यात आलेले आहे. प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी ही शासनाकडे नोंदणीकृत कंपनी आहे. या कर्मचार्‍यांचे वीज वितरण कंपनीकडून प्रत्येक महिन्याचे वेतन प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी कडे वर्ग केले जाते.

 

प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी मधील व्यवस्थापक व लिपिक हे संबंधित कर्मचार्‍यांचे जून महिन्याचे वेतन त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करणे साठी 3 हजार रुपयांची लाचेची मागणी करत होते. यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचार्‍याने अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. तक्रारीचे अनुषंगाने काल लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने लाच मागणी पडताळणी केली. असता जून महिन्याचे वेतन बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी पंचासमक्ष 3 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button