अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ मोठ्या पतसंस्थेतही आढळले बनावट सोने

अहमदनगर- अहमदनगर शहर सहकारी बँकेनंतर त्याच गोल्ड व्हॅल्युअरच्या मदतीने संत नागेबाबा मल्टीस्टेट अर्बन क्रेडीट सोसायटीच्या केडगाव शाखेतही बनावट सोनेतारण कर्जाव्दारे फसवणूक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासणीत दोन कर्ज खात्यांमध्ये 221 ग्रॅम वजनाचे दागिने बनावट आढळून आले. यातून संस्थेची दोन लाख 78 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शाखाधिकारी अनिल रामकिसन देशमुख (वय 29 रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गोल्ड व्हॅल्युअर अजय किशोर कपाले (रा. बालिकाश्रम रोड), सुनील ज्ञानेश्‍वर अळकुटे (रा. सदगुरू टॉवर्स, तपोवन रोड), श्रीतेश रमेश पानपाटील (रा. आलमगिर भिंगार), संदीप सिताराम कदम (रा. निमगाव वाघा ता. नगर), खातेधारक वसिम निसार शेख (रा. इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन) यांच्याविरूध्द हा गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.

 

शहर बँकेच्या फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले, सुनील अळकुटे, श्रीतेश पानपाटील, संदीप कदम यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात खातेधारक तयार करून संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या केडगाव शाखेत अजय कपाले याने सोनेतारण खातेधारकाचे कर्ज खाते तपासून सोनेतारण ठेवले आहे, असे पत्र कोतवाली पोलिसांनी सोसायटीला दिले होते.

 

त्यानुसार खातेधारक वसिम शेख यांची गोल्ड लोनची दोन खाती तपासण्यात आली. यात 221 ग्रॅम वजनाचे सहा दागिने बनावट आढळून आले. त्याव्दारे नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीची दोन लाख 78 हजार रूपयांची फसवणूक झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button