अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: विजेचा धक्का लागून प्रसिध्द न्युरो सर्जनचा मृत्यू

अहमदनगर- विजेचा धक्का लागून शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयाचे सेवानिवृत्त प्रसिध्द न्युरो सर्जन डॉ. काशिनाथ टिंगरे (वय 66) यांचा मृत्यू झाला आहे. ते तळघरातील पाणी काढण्यासाठी विजेची मोटार जोडत असताना ही घटना घडली आहे.

 

डॉ. टिंगरे हे साईबाबा रुग्णालयातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते साकुरी येथे राहत होते. ते एकटेच राहत होते. त्यांच्या जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या घरी बाबासाहेब भाऊसाहेब बावके हे गेले असता ते घरात दिसले नाहीत. म्हणून बावके यांनी तळघरात डॉक्टरांना पाहण्यासाठी गेले असता, एक इलेक्ट्रिक मोटार व वायरिंग व तळघरात दोन फूट उंच पाणी साचलेले दिसले.

 

पाण्यात पाहिले असता त्यांना डॉ. टिंगरे हे पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या एका हातामध्ये वायर दिसून आली. त्यांच्या डावे हाताचे अंगठ्याजवळ दोन बोटाला जखम झाल्याचे दिसून आले. बावके यांनी त्यांना हाक मारली. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे डॉ. टिंगरे मयत झाल्याची बावके यांना खात्री झाल्याने त्यांनी राहाता पोलीस ठाण्यात या प्रकाराची खबर दिली.

 

राहाता पोलिसांनी अकस्मातची नोंद केली आहे. या घटनेचा तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आवारे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button