अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कारच्या धडकेत शेतकरी ठार

अहमदनगर- रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर शेळ्या चारत असलेल्या शेतकर्‍यास कारने धडक दिल्याने त्यात शेतकर्‍यासह एका शेळीचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील खडका शिरसगाव रोडवर जळके खुर्द येथे घडली.

 

याबबात नेवासा पोलीस ठाण्यात कार चालकावर अपघात करुन मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत राजू उत्तम वाघमारे (वय 45) रा. जळके खुर्द ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की त्यांचे वडील उत्तम नाथा वाघमारे रा. जळके खुर्द हे जळके खुर्द येथील चांगदेव शिंदे यांच्या शेताच्या बांधालगत रोडच्या कडेला शेळ्या चारत असताना खडका फाट्याकडून शिरसगावकडे पांढर्‍या रंगाची कार (एमएच 12 टीसी 773) तिच्यावरील चालकाने भरधाव वेगात चालवत रोडच्या कडेला चरत असलेल्या शेळीला व माझ्या वडिलांना जोराची धडक देवून अपघात केला.

 

शेळीच्या व उत्तम वाघमारे यांच्या मरणास कारणीभूत होवून न थांबता निघून गेला आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 106/2022 भारतीय दंड विधान कलम 304(अ), 279, 337, 338, 427 व मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे हे करत आहेत.

 

उत्तम नाथा वैरागर यांच्या पश्चात राजेंद्र उत्तम वाघमारे व ज्ञानेश्वर उत्तम वाघमारे ही दोन मुले आहेत. त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय होता. जळके खुर्द येथील उद्योजक सुनील वाघमारे यांचे ते आजोबा होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button