बाजारभाव

अहमदनगर ब्रेकींग: कांद्याचे भाव कमी झाल्याने शेतकरी आक्रमक; लिलाव पाडला बंद

अहमदनगर- येथील बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज कमी दराने कांदा लिलाव सुरू होताच शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद करून आंदोलन केले. दरम्यान शेतकर्‍यांनी केलेल्या मागणीनुसार कांद्याला भाव दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

 

या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी नगरसेवक निखील वारे, प्रकाश कुलट आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

जिल्ह्यामध्ये अवघा दीड हजार रुपये भाव कांद्याला मिळत आहेत. नगर सोमवारी बाजार समितीत कांद्याचे लिलाव 1800 रुपयांपर्यंत सुरू झाले. इतर बाजार समितीचे बाजारभाव मात्र 3500 ते 3800 इतके असताना नगरमध्ये मात्र 1800 पर्यंतच होते.

 

त्यामुळे शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले. कार्ले यांनी त्यानंतर शेतकरी व्यापारी, मार्केट कमिटीचे सचिव भिसे हे सर्व शेतकरी यांच्या समोरच चर्चा केली. यानंतर भाव वाढून देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button