अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अखेर ‘ते’ वादग्रस्त पोलीस निरीक्षक ‘कंट्रोल’ मध्ये

अहमदनगर – राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. शहरातील कत्तलखाने उद्ध्वस्त करावे अशी मागणी वारंवार करूनही या कत्तलखान्यावर कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान यामुळे गेल्या दीड वर्षापासून आपल्या वागणुकीतून वादग्रस्त ठरलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांची तडका फडकी जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

 

देशमुख यांच्या विरोधात संगमनेर येथील विरोधकांच्या अनेक तक्रारी असल्याने त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी देशमुख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. कडक स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात होते. देशमुख यांचा आवेश अवघा महिन्याभरच टिकला. महिन्याभरानंतर संगमनेर शहरातील सर्व अवैध व्यवसाय जोरात सुरू झाले. सर्व बेकायदेशीर कत्तलखाने खुलेआम चालू झाले.

 

भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांनी संगमनेरच्या कत्तलखाण्याच्या प्रश्नात लक्ष घातले. नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन त्यांनी संगमनेर येथील कत्तल खाण्याची कल्पना दिली. यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या कत्तलखान्याबाबत गंभीर दाखल घेतली.

 

या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्याविरुद्ध ठीक ठिकाणी तक्रारी केल्या. मात्र त्यांना अभय मिळत गेले. अवैध व्यवसाय बरोबरच संगमनेर शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. अनेक ठिकाणी चोऱ्या होत असताना शहर पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले होते. मटका, जुगार, गुटखा व्यवसाय संगमनेर शहरामध्ये खुलेआम सुरू आहे. या व्यवसायाविरुद्ध कारवाई करण्याऐवजी असे व्यवसाय चालवणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकाऱ्यांनी आर्थिक फायदा करून यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवरही त्यांचा अंकुश नसल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावले होते.

 

काल पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना तातडीने जिल्हा मुख्यालयात बोलावून घेण्यात आले. त्यांची बदली झाल्याने गृहखाते पुढे काय कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. समजलेल्या माहितीनुसार देशमुख यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button