अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: खासगी हॉस्पिटलला आग; मोठा अनर्थ…

अहमदनगर- नगर-मनमाड महामार्गावरील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या बेसमेंट मधील भागात आज दुपारी आग लागली होती. दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

 

हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये काही बॉक्सचे पुठ्ठे, फायली, केस पेपर आदी सामान ठेवलेले होते. साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास बेसमेंटमधून धूर येताना दिसला. तेथील कर्मचार्‍यांनी जाऊन पाहणी केली असता बेसमेंटमध्ये आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ तोफखाना पोलीस व महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच तोफखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून तात्काळ आग आटोक्यात आणली.

 

दरम्यान, आग लागलेली असताना तळमजल्यावर काही रूग्णांवर उपचार सुरू होते. रूग्णालयात धुराचे लोट पसरल्याने आग विझवताना कर्मचार्‍यांना अडचणी येत होत्या. रूग्ण व नातेवाईकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यातच आग लागलेल्या ठिकाणापासून जवळच जनरेटर व ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आलेले होते. सुदैवाने तिथपर्यंत आगेची झळ न पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याची नोंद नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button