अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: आधी दारू पाजली, नंतर कॅनॉलमध्ये फेकले; तरूणाचा थंड डोक्याने खुन

अहमदनगर – तरूणाला जास्त दारू पाजून त्याला श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी कॅनॉलमध्ये फेकून देत खुन केल्याची धक्कादायक घटना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे.

सागर कुमार झरेकर (वय २५ रा. घोसपुरी ता. नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो १४ जानेवारी, २०२२ पासून घरातून गायब झाला होता. त्याच्या घरच्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्या दोघांनी खून केला असल्याची माहिती सहा महिन्यांनंतर समोर आली आहे.

हे पण वाचा : मध्यप्रदेशातून गावठी कट्टे घेऊन विक्रीसाठी नगरमध्ये आला अन् पोलिसांच्या सापळ्यात अडकला

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सुनील चव्हाण यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विश्वनाथ ऊर्फ सुशांत सोपान भापकर (वय २८ रा.कोळगाव ता. श्रीगोंदा)

त्याचा मित्र गौरव गोरक्ष साके (वय २० रा. साकेवाडी ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकींग: ‘तो’ तालुका पुन्हा गोळीबाराने हादरला; पोलिसांना मदत करतो म्हणून…

सागर झरेकरच्या बहिणीचे आयुष्य उध्दवस्त करून तिला धडा शिकविण्यासाठी विश्वनाथ उर्फ सुशांत सोपान भापकर याने त्याचा मित्र गौरव साके याचे मदतीने सागर झरेकर याला जिवे ठार मारण्यासाठी कट आखला.

याबाबत कोठेही चर्चा न करण्यासाठी विश्वनाथने गौरवला ५० हजार रुपये देण्याचे कबुल करुन प्रत्यक्षात ४० हजार रुपये दिले होते.

हे पण वाचा : पर्यटकांना खुणावणारे जिल्ह्यातील ‘हे’ धरण अखेर भरले

१४ जानेवारी, २०२२ रोजी रात्री चिखली घाटाचे बाजुस असलेल्या फॉरेस्टमध्ये सागरला जास्त प्रमाणात दारू पाजुन त्यास नंतर दुचाकीवरुन मोहरवाडी गावाचे शिवार घेवुन येवुन रात्री 9.30 वा. सुमारास कुकडी कॅनॉलचे पाण्यात जिवंत फेकुन देवुन जिवे ठार मारले असल्याचे चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

विश्वनाथ उर्फ सुशांत सोपान भापकर व गौरव गोरक्ष साके यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 302, 201, 120 (ब),34 अन्वये गुन्हा दाखल केली आहे.

हे पण वाचा : बाजार भाव: कांदा, सोयाबीन, डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

Related Articles

Leave a Reply

Back to top button