अहमदनगर ब्रेकींग: पंचायत समितीच्या माजी सदस्याचा महिलेवर अत्याचार

अहमदनगर- प्रमोशनचे आमिष दाखवून संगमनेर पंचायत समितीच्या माजी सदस्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई असलेल्या एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी ऊर्फ विष्णुपंत रहाटळ असे त्या माजी सदस्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, पिडीत महिला ही तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई या पदावर काम करत होती. सदर महिलेला आरोग्य खात्यात प्रमोशन मिळवून देतो, असे अमिष दाखवून जवळीक केली. व तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.
तसेच विष्णुपंत रहाटळ याने सदर महिलेच्या घरी जावून तिला गुंगीचे औषध देवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर बाभळेश्वर, सिन्नर, सुकेवाडी तसेच संगमनेर शहरातील रहाटळ याचे घरी नेवून बळजबरीने संबध ठेवून तिच्याकडून पैसे घेवून वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करुन अत्याचार केल्याचे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पिडीत महिलेने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शिवाजी ऊर्फ विष्णुपंत रहाटळ याच्याविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करत आहे.