अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: समाजकंटकांनी लावली गणपती मंडळाच्या मंडपाला आग

अहमदनगर- गणपती मंडळाच्या स्टेजवरील मंडपाला अज्ञात व्यक्तीने आग लावून नुकसान केले. मध्यरात्री सावेडी गावठाण येथील गणेश चौकातील जय भवानी तरूण मंडळाच्या मंडपाला समाजकंटकांनी ही आग लावली.

 

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष सचिन विठ्ठल आडोळे (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

 

गणेशोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. ठिकठिकाणी गणेश मंडळांनी मंडपाची उभारणी केली आहे. आडोळे यांनीही त्यांच्या जय भवानी तरूण गणपती मंडळाचे स्टेज गणेश चौकात उभारले आहे. रात्री आडोळे व मंडळाचे पदाधिकारी तेथे होते. एक वाजता ते झोपण्यासाठी घरी गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने स्टेजवरील मंडपाला आग लावली.

 

हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान आडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button