अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या युवतीला पळविले

घरातून कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या युवतीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. पीडित युवतीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंगार शहरात राहणार्‍या फिर्यादी यांची मुलगी बुरूडगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये शिक्षण घेते. दि. 27 मे रोजी फिर्यादी यांच्या मुलीची युनिट टेस्ट चाचणी परिक्षा असल्याने तिला सकाळी 11 वाजता तिच्या भावाने कॉलेजमध्ये सोडले होते.

दुपारी 12 वाजता फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाईलवर फिर्यादी यांच्या मुलीच्या मैत्रिणीचा फोन आला. तुमची मुलगी पेपरसाठी आली नसल्याचे तिने सांगितले. मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

यानंतर मुलीच्या आईने मुलीला पळवून नेले असल्याची फिर्याद कोतवाली पोलिसांत दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button