अहमदनगर ब्रेकींग: किराणा दुकानाला आग; तिसऱ्या मजल्यावर आठ व्यक्ती….

सावेडीतील श्रमिकनगर येथील एसआर किराणा दुकानाला आज सकाळी आग लागली. जमिनीवर असलेल्या किराणा दुकानाला लागलेली आग काही वेळातच दुसर्या मजल्यापर्यंत पोहचली.
दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर दुकान मालकाचे कुटुंब राहते. घरामध्ये आठ व्यक्ती होत्या. आग वेळीच लक्षात आल्याने आणि ती विझवल्याने त्या व्यक्ती सुखरूप आहेत. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले.
महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग पाणी शिंपडून विझवली. दुकानातून आगीचे लोट बाहेर आल्यानंतर आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली.
महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशी यांनी आग विझवण्यासाठी मोठी मदत केली. महापालिकेचा अग्निशमन बंब सकाळी सातच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचला. कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.
सुरूवातीला जमिनीवर असलेल्या किराणा दुकानाला आग लागली. त्यानंतर आग दुसर्या मजल्यापर्यंत पोचली. दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर घरामध्ये आठ व्यक्ती होत्या.
धूर तिसरा मजल्यापर्यंत पोहोचला होता. आम्ही घरातील सर्व सुखरूप आहोत. मात्र आगीमुळे दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले, असे दुकान मालकाने सांगितले.