अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: गोळीबाराने ‘तो’ तालुका पुन्हा हादरला

अहमदनगर- दुचाकीवरून आलेल्या तीन जणांपैकी एकाने हवेत तीन गोळीबार केले तर दुसऱ्याने त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका तरूणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. काल सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान नेवासा फाटा ते नेवासा दरम्यान असलेल्या सेंट मेरी स्कूल रोडसमोर ही घटना घडली.

या घटनेबाबत पोलिसांकडून देखील अधिकृत माहिती मिळू शकली नाही. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. घटनास्थळावरून दोन ऊडालेल्या गोळ्यांच्या कॅप व एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. त्याठिकाणी तीन ते चार प्रत्यक्षदर्शींचे जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात आले.

सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान तीन जण नेवासा फाट्याकडून दुचाकीवर आले. सेंट मेरी स्कूल समोरील रोडवर आल्यानंतर दुचाकी थांबवत एकाने हवेत तीन गोळीबार केले. तर दुचाकीवरील दुसऱ्याने दुकानासमोर उभ्या असलेल्या एका तरूणाच्या डोक्यात काचेची बाटली मारली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला नेवासाफाटा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस निरीक्षक करे यांनी परिसरात कुठे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button