अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: टेम्पोच्या धडकेत पती-पत्नी ठार

अहमदनगर- आयशर टेम्पोने रस्त्याने जाणार्‍या दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठार झाल्याची घटना आज (रविवार) घडली. संभाजी मानसिंग मोहिते (वय 50) व त्यांच्या 45 वर्षीय पत्नी (रा. दौंड) अशी या अपघातात मृत्यु झालेल्यांची नावे आहेत.

 

श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड महामार्गावर कोळगाव येथील कण्हेरमळा परिसरात हा अपघात झाला. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मोहिते पती-पत्नी दुचाकी पंक्चर झाल्यामुळे पायी उतरून गाडी ढकलत महामार्गाने चालले होते. दरम्यान पाठीमागच्या बाजूने भरधाव आलेल्या एका टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली. यामुळे पतीचा घटनास्थळीच मृत्यु झाला.

 

तर पत्नीचा नगर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. यात त्यांना मदत करणारा एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर टेम्पो चालक टेंपो सोडून पळून गेला. बेलवंडी पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात पाठवले. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button