अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पतीने केला गर्भवती पत्नीचा खून

अहमदनगर- आई-वडिलांना भेटण्यासाठी जाऊ असे म्हटल्याने गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केला. सोनाली गणेश गायकवाड असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. श्रीरामपूर शहरातील वॉर्ड. नं. 6, कांदा मार्केट या भागात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याील शहागड येथील रहिवासी असलेला गणेश भिमा गायकवाड हा पत्नी सोनालीला घेऊन कामानिमित्त श्रीरामपूर येथे आला होता. याठिकाणी सोनालीचे आजोबा ज्ञानदेव आढागळे हे वॉर्ड नं. 6 कांदा मार्केटसमोर, भीमनगर येथे राहत होते.

 

सोनाली व तिचा पती गणेश गायकवाड हे दोघेही त्यांच्याच खोलीत राहत होते. दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान सोनाली ही घरात एकटी असताना तिचा पती गणेश भिमा गायकवाड, (वय 22), मूळ रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना यास आपण आई-वडिलांना भेटण्यासाठी जाऊ असे म्हटल्याचा राग आला. त्याने पत्नी सोनाली गरोदर असताना तिला बेदम मारहाण करून तिच्या पोटावर दुखापत केली.

 

त्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडली. तिला औषधोपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असता ती मयत झाली आहे.

 

  1. याप्रकरणी सोनाली हिची आई वंदना भिमराव लोंढे (रा. खालापुरी, ता. शिरूर, जि. बीड) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी गणेश गायकवाड याच्याविरुध्द गुन्हा रजि. नं. 959/2022, भादंवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button