अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: अवैध गर्भनिरोधक गोळ्यांचा एक कोटींचा साठा जप्त

अहमदनगर – गोदामावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे एक कोटी पेक्षा जास्त रक्कमेचा औषध साठा पकडला.राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोडवर आज दुपारी ही कारवाई झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांसह व्हायग्रा गोळ्यांचा साठा आढळून आला आहे.
या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बेकायदेशीरपणे हा साठा करण्यात आला असून याच गोदामातून औषधांची छुपी विक्री सुरू होती.
ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी येऊन या औषधांची तपासणी सुरू केली आहे. त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.