अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: जामखेड दुहेरी हत्याकांड; मुख्य आरोपीस जन्मठेप, १३ आरोपींची…

अहमदनगर- राजकीय वर्चस्वादातून योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोन तरुणांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी स्वामी ऊर्फ गोविंद दत्तात्रय गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांनी हा निकाल दिला. इतर आरोपींची सुटका करण्यात आली.

 

यात सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी काम पाहिले. झाल्याने दोषी ठरविलेले आरोपी गायकवाड यांनी राळेभात बंधूंचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैद, भारतीय हत्यार कायदा कलम 3/27 नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, दि. 28 एप्रिल 2018 रोजी ही घटना घडली होती. जामखेड शहरात दोन राजकीय गटात अनेक वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू होती. राजकीय शुभेच्छाचा पोस्टर फाडल्याच्या रागातून सायंकाळच्या समावेश एका हॉटेलात योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या करण्यात आले होते. या घटनेमुळे जामखेड संपूर्ण नगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. राजकीय वर्चस्वाचा हत्येपर्यंत मोठी खळबळ झाली होती.

 

पोलिसांनी सदर गुन्ह्यात गोविंद दत्तात्रय गायकवाड, विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काका बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गायकवाड वगळता इतरांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. तत्कालीन पोलीस उपधीक्षक सुदर्शन मुंडे हे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी होते.

 

खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी आदी एकूण 32 साक्षीदारांची तपासणी केली. बचाव पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. राजकीय वर्चस्व वादातून हे दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी अंतिम लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button