अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: एलसीबीची मोठी कारवाई; हत्यारासह टोळी जेरंबद

अहमदनगर- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार राहुल अनिल काळे, शुभम अनिल काळे, भरत तात्याजी काळे, विकास शेखर जाधव (सर्व रा. गणेशनगर ता. राहाता) यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांचे साथीदार अक्षय यशवंत आव्हाड आणि आनंदा अनिल काळे (दोघे रा. गणेशनगर ता. राहाता) हे पसार झाले आहेत.

 

अटक केलेल्या चौघांकडून तलवार, लाकडी दांडके, मिरची पुड, दोरी असा 30 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी ते शेंडी बायपास रोडवरील वडगाव गुप्ता काल रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.

 

सहा जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि. कलम 399, 402, आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संतोष लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button