अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अंब्याच्या झाडाला गळफास घेत संपविले जीवन

अंब्याच्या झाडाला गळफास घेत एकाने आत्महत्या केली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुदाम रामदास वाघ (वय 45 रा. शिराढोण ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाघ यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

वाळुंज (ता. नगर) शिवारात अंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आज सकाळी निदर्शनास आला. याबाबतची माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली.

सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान वाघ यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली

याबाबतची माहिती अद्याप समजली नाही, याविषयी अधिक तपास करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक सानप यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button