अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पोलिसांची मोठी कारवाई; औरंगाबादला गोमांस घेऊन जाणारा पिकअप पकडला

कोतवाली पोलिसांनी आज, गुरूवार पहाटे अहमदनगर शहरात कारवाई करून तीन लाखांच्या गोमांससह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय, पराग बिल्डींगच्या पाठीमागे पार्किंगजवळ ही कारवाई केली.

तीन लाख रूपये किंमतीचे गोमांस, पिकअप असा सहा लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोहम्मद मोसीन अब्दुल जब्बार (वय 50 रा. गंगाखेड, औरंगाबाद), वसीम अन्वर शेख (वय 40 रा. उस्मानपुरा पीर बाजार, औरंगाबाद), जावेद मलिक कुरेशी (रा. पैठणगेट, औरंगाबाद), जावेश कुरेशी व पप्पु कुरेशी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मोहम्मद जब्बार व वसीम शेख यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई अतुल काजळे यांनी फिर्याद दिली आहे.

मोहम्मद जब्बार व वसीम शेख यांना गोमांसची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे याविषयी चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना इतर तिघांची नावे सांगितले.

सदरचे गोमांस जावेद मलिक कुरेशी याच्या सांगण्यावरून जब्बार व शेख यांनी जावेद कुरेशी व पप्पु कुरेशी यांच्याकडून घेतल्याची कबूली दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button