अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: लग्नातील दागिने आणि घरातील रक्कम घेऊन विवाहिता पसार

अहमदनगर- विवाहितेने तिच्या आईसह लग्नात केलेले दागिणे आणि रोख रक्कम असा पाच लाख 82 हजार 979 रूपयांचा ऐवज घेऊन पळ काढला आहे.

 

याप्रकरणी तरूणाने येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. महेश प्रभाकर भांबरकर (वय 24 रा. भुषणनगर, केडगाव) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

पत्नी आश्‍विनी महेश भांबरकर, सासू सुजाता राजु जाधव, सासरा राजु जाधव, मेव्हणा आकाश राजु जाधव (सर्व रा. वडगाव आमली ता. पारनेर) व लग्न जमवणारा मध्यस्थी राजेंद्र पाोखरणा (रा. भाळवणी ता. पारनेर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

22 मे, 2022 रोजी फिर्यादी महेश यांचे आश्‍विनीसोबत लग्न झाले होते. त्याासाठी राजेंद्र पोखरणा याने मध्यस्थी केली होती. याबाबत दिलेल्या फिर्यादीत महेशने म्हटले आहे की,‘पत्नी अश्विनी हिच्याविषयी लग्न जमवणारे पोखरणा, सासु सुजाता, सासरे राजु, मेव्हणा आकाश यांनी खरी माहिती सांगितली नाही. माझ्या आई वडीलांच्या इस्टेटवर नजर ठेवुन माझ्या सोबत अश्विनीचा विवाह लावुन दिला.

 

22 मे 2022 ते 15 जुलै, 2022 या कालावधीत आश्‍विनीने मला वेळोवेळी विश्वासात घेतले. तीची आई सुजातास 16 जुलै, 2022 रोजी केडगाव येथील माझे रहाते घरी मी घरात नसतांना बोलावुन घेतले. त्यांनी दोघींनी सासरे राजु, मेव्हणा आकाश व मध्यस्थी पोखरणा यांचे सांगणेवरून माझा विश्वासघात करून माझे घरातील रोख रक्कम व माझे वडीलांनी लग्नाचे वेळी केलेले सोन्या-चांदीचे दागिणे व घरातील कपडे असा एकुण पाच लाख 82 हजार 979 रूपये किंमतीचा ऐवज घेवुन पोबारा केला. त्या सर्वांनी संगणमताने माझी व माझे कुटुंबाची फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button