अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: मंत्री गडाख यांच्या पीएवर गोळीबार; ‘त्या’ आरोपीला ठोकल्या बेड्या

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे गोळीबार प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला शेवगाव येथून अटक केली. नितीन शिरसाठ (रा. वांजोळी ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्वीय सहाय्यक राजळे यांना शुक्रवारी रात्री लोहगाव परिसरात पिस्तूलाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग करून जखमी केले होते. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी पाठवलेले होते.
आज आरोपी शिरसाठ याला अटक करून सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी बबलू लोंढे, संतोष भिंगारदिवे व ऋषिकेश शेटे अजुनही पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.