अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग ! मंत्री शंकरराव गडाखांचे पीएवर गोळीबार

अहमदनगर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी घोडेगाव या ठिकाणी जीव घेणे हल्ला करून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

सदर घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर पीए राहुल राजळे यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले.

हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही याबाबत अधिक माहिती अशी, राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी लोहगाव येथे जीवघेणा हल्ला केला.

यावेळी ३ ते ४ अज्ञातांनी गोळीबार केला. राजळे यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते. दरम्यान राजळे एका यात्रेतून आपल्या घरी परतत असताना आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी डाव साधला.

त्यांच्यावर ५ फायर झाले, त्यापैकी २ गोळ्या त्यांना लागल्या. घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. राहुल राहुल राजळे यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले. रात्री १२ च्या सुमारास त्यांच्यावर तातडीने शत्रक्रिया करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button