अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: बदनामीची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर- 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मोबाईलवर ओळख करून तिला बदनामीची धमकी देवून तिच्यावर तरूणाने वेळोवेळी अत्याचार केला. यातून पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहुन प्रसुती झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

 

याप्रकरणी पीडीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी या धक्कादायक प्रकारातून सावरत थेट पोलिसांत फिर्याद दिली. अजमोद्दीन महंमद शेख (वय 28 रा. कात्रड, ता. राहुरी) या नराधामाविरोधात अत्याचार व पोस्को कायदा (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास करत आरोपीला अटक केली.

 

श्रीरामपूरचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, राहुरीचे पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने राहुरी तालुक्यात पालकवर्गात खळबळ उडाली आहे. मुलगी अल्पवयीन तर आरोपी सज्ञान आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button