अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अज्ञाताने अल्पवयीन मुलीला पळविले

अहमदनगर- रविवारी रात्री नगर तालुक्यातील एका गावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नगर तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेल्या फिर्यादी यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. याची माहिती फिर्यादी यांना मिळताच त्यांनी मुलीचा इतरत्र शोध घेतला. ती मिळून न आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button