अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीवर लाॅजवर अत्याचार

अहमदनगर- येथील अदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लोणावळा (जि. पुणे) येथील लाॅजवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.

 

अत्याचार करणार्‍या तरूणाला तोफखाना पोलिसांनी लोणावळा (जि. पुणे) येथून ताब्यात घेत अटक केली असून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. विश्‍वनाथ चिमाजी गडदे (वय 32 रा. गडदे आखाडा, राहुरी) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

 

येथील अदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात 84 मुली राहतात. राहुरी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी या वसतिगृहात राहत होती. ती शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत होती. 2 फेब्रुवारीला दुपारी ती विद्यालयात क्लाससाठी जाते म्हणून वसतिगृहातून बाहेर पडली. ती सायंकाळपर्यंत घरी आली नाही. याप्रकरणी वसतिगृहाचे काम पाहणार्‍या महिलेने 3 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

 

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जे.सी. मुजावर हे करीत आहेत. त्यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप बडे यांनी पीडित मुलीला पळवून नेणार्‍या विश्‍वनाथ गडदे याचे लोकेशन काढून त्याला लोणावळा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. पीडित मुलीच्या जबाबावरून त्याच्याविरूध्द अत्याचारा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button