अहमदनगर ब्रेकींग: फ्लॅटवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर- अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्या बंटी ऊर्फ भावेश राऊत (रा. लाटेगल्ली, माणिकचौक) या तरूणाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
बंटी ऊर्फ भावेश राऊत याने 25 नोव्हेंबर, 2022 व त्यापूर्वी वेळोवेळी त्याच्या फ्लॅटवर नेऊन फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याची माहिती फिर्यादी यांना मिळाली असता त्यांनी भावेशकडे विचारणा केली. तो फिर्यादीला म्हणाला,‘मी तुझी खोटी बदनामी करेल की तू हनिट्रॅप चालविते’, अशी धमकी दिली.
तसेच 4 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरी असताना भावेश त्यांच्या घरी आला. फिर्यादीकडे त्याने 15 हजार रूपयांची मागणी केेली. पैसे दिले नाही तर तुझ्या मुलीचे माझ्याकडील फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली.
27 डिसेंबर, 2022 रोजी रात्री नऊ वाजता फिर्यादी त्यांच्या घरी असताना त्यांनी भावेशला फोन करून हातउसणे दिलेल्या पैशाची मागणी केली. त्याचा त्याला राग आल्याने त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भावेशविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करीत आहेत.