अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात आईचा मृत्यू, मुलगा गंभीर

अहमदनगर- कंटनेरने दुचाकीवर चाललेल्या मायलेकांना समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील महिला ठार झाली आहे. तर तीचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. नगर-मनमाड महामार्गावर राहुरीच्या सूतगिरणी जवळ हा अपघात झाला.
सोमवारी सकाळी नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका येथील सोमनाथ विलास चौधरी हा आपल्या आईसोबत दुचाकीवरून नगर तालुक्यातील निमगाव येथे नातेवाईकांच्या वर्षश्राद्धासाठी जात असताना राहुरी सुतगिरणीजवळ कंटनेरने त्यांच्या दुचाकीला जोराची समोरून धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील सोमनाथ चौधरी याची आई लता विलास चौधरी (वय ४९) या जागेवर ठार झाल्या. तसेच सोमनाथ चौधरी हा गंभिररित्या जखमी झाल्याने त्याला नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत राहूल विलास चौधरी यांनी राहुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.