अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : खून करून रस्त्याच्या कडेला मृतदेह …

एका 22 वर्षीय तरुणाला ठार करण्यात आले. तर हा अपघात आहे असे भासविण्यासाठी त्यास रस्त्याच्या कडेला एका विरळ गवतात फेकूण दिले गेले.

हा धक्कादायक प्रकार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी घुलेवाडी परिसरात संगमनेर साखर कारखान्याकडे जाणार्‍या रोडवर घडला. हा अपघात आहे असे म्हणून याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.

मात्र, त्याचे शवविच्छेदन केले असता एक महिन्यानंतर वैद्यकीय अहवाल आला असता हा अपघात नसून खून आहे हे सिद्ध झाले.

त्यानंतर संगमनेर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्काळ कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला असून या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.

घुलेवाडी परिसरात संगमनेर साखर कारखान्याकडे जाणार्‍या रोडच्याकडेल गवतात एका तरुण मुलाचा मृतदेह पडला होता,त्याच्या शरिरावर जवळजवळ अनेक जखमा होत्या.

तर डोक्याला मार देखील लागलेला होता. आता जो कोणी पोलिस असेल त्यांनी फार टेन्शन घेण्याचे काम केले नसावे.

त्यामुळे, या मयत प्रकरणी त्यांनी पंचनामा केला आणि कागदी घोडे नाचवून पुढे मृतदेहाची विल्हेवाट करण्यास सुरूवात केली.

दुर्दैवाने या तरुणाचे नाव काय माहिती नाही, कोणी मारले माहित नाही, कसा व का मारला माहिती नाही, हा कुठला आहे.

हे देखील माहित नाही त्यामुळे, मृत्यु नंतर देखील त्याच्या मृतदेहची अवहेलना झाली. दरम्यान तरुणावर अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

तर, या व्यक्तीचे नाव काय आहे? तो कोठे राहतो याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी, काही जिल्ह्यात त्याच्या वर्णणाची माहिती देण्यात आली, बस स्थानक, सार्वजानिक ठिकाणे या जागेंवर पोष्टर लावण्यात आले.

मात्र, तरी देखील या तरुणाची ओळख पटली नाही. आता या व्यक्तीची ओळखच पटली नाही. तर त्याच्या हत्यार्‍याचा शोध कसा लागणार? यावर प्रश्नचिन्ह कायम असणार आहे. कारण, हा तपासच कायम तपासावर राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button