अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दोरीने गळा आवळून युवकाचा खून

अहमदनगर – दोन युवकांनी एका युवकाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चास (ता. नगर) शिवारात घडली. राहुल कनका मोरे (वय 19 रा. बाबुर्डी घुमट, बस स्टँड जवळ, ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी हनुमंत नरसू गायकवाड (वय- 24) व सुरज लक्षमन मोरे (वय 22 दोघे रा. बाबुर्डी घुमट) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राहुलने सूरजच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या कारणवरून त्याचा दोरीने गळा आवळून खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button