अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: नाशिक पथकाची नगरमध्ये मोठी कारवाई; पकडली ही टोळी

अहमदनगर- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांच्या विशेष पथक व सुपा पोलिसांनी मोठी कारवाई करत नगर-पुणे महामार्गावर वाडेगव्हाण येथील हॉटेलवर छापा टाकून लोंखडी स्टिल (बांधकाम सळ्या) चोरून विक्री करणारी टोळी पकडली आहे. त्याच्याकडून 17 लाख 76 हजार 872 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिस दोघाचा शोध घेत आहेत.

 

 

नाशिक आयजी विशेष पोलीस पथकातील हवालदार शेख शकील अहमद यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, गुरूवारी (दि.4) सकाळी 6.30 वाजता सुपा पोलीस स्टेशन (नगर) हद्दीत बेलवंडी फाट्याजवळ वाडेगव्हाण नगर-पुणे हायवे लगत हॉटेल मातोश्रीचे पाठीमागे पत्र्यांचे कंपाऊंड लगत असलेल्या मोकळ्या जागेत आरोपी मजीबुल रेहमान इलाकत गद्दी (वय 42) रा. तौलीहवा जि. कपीलवास्तु नेपाळ सध्या रा.मातोश्री हॉटेल, वाडेगव्हाण, बेलवंडी फाट्याजवळ, दिलशाद खान अन्सार खान (वय 24) रा. चककाजीपुरा थाना गाजीपुरा जि. फतेहपुर राज्य उत्तरप्रदेश, रिजवान खान युसुफ खान (वय 32) रा. ज्वालागंज, पिरणपुर मोहल्ला, पाण्याच्या टाकीजवळ, घर.नं. 304, फेतहपुर, जि. फतहपुर राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. मातोश्री हॉटेल, वाडेगव्हाण, आफताब लल्लन खान (वय 19) रा. लखनऊ राज्य उत्तर प्रदेश सध्या वाळा राजगुरु यांच्या घरात भाडे तत्वावर, बस स्टॅन्ड जवळ, शिरुर जि. पुणे, लल्लन खान सध्या रा. शिरुर जि. पुणे (पाहिजे आरोपी), अजित दत्तात्रय मासाळ (वय 25) सध्या रा. चिखली, मोरे वस्ती ता. निगडी जि. पुणे. मुळ रा. वाखवड ता. भुम जि.उस्मानबाद, बाळु शेळके रा. वाडेगव्हाण नगर हे वाहन क्रमांक एम.एच.16 बी 7955 या वाहनातून लोखंडी सळया, वजन काटा, कटावनी आदी साहित्याच्या मदतीने माल काढून काळाबाजारात विकत असतांना रंगेहात पकडले गेले.

 

 

त्यावेळीस त्याच्याकडून 10 हजार रुपये किंमतीचे एक स्टिल (आसारी) कापण्यासाठी असलेली लोखंडी गॅस कटर, नोझलसह त्यास भारत कंपनीची गॅस टाकी व लोखंडी निमुळते सिलेंडर घटनास्थळावर मिळून आले, तसेच 15 हजार किंमतीचा एक इलेक्ट्रीक वजन काटा डिस्ल्पेसह, 1 हजार रुपये एक लोखंडी हातोडा, 500 रुपये किंमती स्टिल पकडण्यासाठी वापरत असलेली कैच्ची, 15 लाख 76 हजार 212 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 5 लाख रुपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम. एच. 42 बी 7955, तसेच 16 हजार 280 किलो वजनाची स्टिल असलेला ट्रक त्यापैकी 78 किलो वजनाचा मुद्देमाल असा एकूण 17 लाख 76 हजार 872 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.शेख यांच्या फिर्यादी वरुन स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरिक्षक अनिल कटके पोलिस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमलदार सुनिल कुटे यांनी वरील आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच आरोपीना अटक केली असून दोघांचा शोध घेतला जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Back to top button